*माजी सैनिक कल्याण विभागातील बिंदूनियमावली तयार करून रिक्त जागा भरण्याचे सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांचे समवेतील बैठकीत उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले निर्देश...*
मुंबई दि.११ : माजी सैनिक कल्याण विभागा अंतर्गत २०१३ पासून सुरू असलेला पेंशन सेल कार्यरत ठेवण्याबाबत विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बैठक आयोजित केली होती. महाराष्ट्रात सुमारे १,७५,००० च्या आसपास माजी सैनिक व विरपत्नी आहेत. त्यापैकी १,१०,००० पेक्षा जास्त केसेस या सेलने आतापर्यंत हाताळल्या आहेत. यापैकी १६५४५ विधवांना निवृत्ती वेतनसाठी या सेलने मदत केली आहे.तसेच केवळ १४ जिल्ह्या तच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यरत असून उर्वरित जिल्ह्यात अतिरिक्त पदभार हा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.यावरती याबैठकीत मंजूर २७५ पदांची बिंदुनियमावली मंजूर करून जागा भरण्याचे निर्देश ना.दादा भुसे- सैनिक कल्याण मंत्री यांनी प्रशासनास दिले. यामुळे माजी सैनिकांचे प्रश्न लवकर निकाली लागतील आणि त्यांना न्याय मिळेल असे ते म्हणाले. सदरील कक्षात विधवा महिलांना मदत व सहकार्य होण्याच्या दृष्टीने समाजशास्त्रमध्ये पदवी घेतलेल्या महिलेची नियुक्त करण्याची सूचना ना.डॉ.गोऱ्हे यांनी दिली. तसेच रिक्त पदे भरण्याची कार्यवाही एमपीएससी मार्फत पुढील सहा महिन्यात पूर्ण करण्यात यावेत त्या प्रमाणे संचालक सैनिक कल्याणसाठी पूर्णवेळ अधिकारी देण्यासाठी एमपीएससीकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश ना.डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिले.
यावेळी श्रीमती वल्सा नायर सिंह प्रधानसचिव सैनिक कल्याण, लक्ष्मीनारायण मिश्रा - संचालक सैनिक कल्याण, सुरेश खाडे-उपसचिव संजीव वेलूसकर अवर सचिव,प्र.शं.बिरादार,उ.पो.सावंत-कक्ष अधिकारी उपस्थित होते.
 
Top