सोलापूर, दि. ११ :- पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध विकास कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडाबाबत आज बैठक घेतली त्यावेळी दिल्या.   

   बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जलसंपदा विभागांचें अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, क्षमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, पंढरपूर नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.      

 बैठकीत पंढरपुरातील तीर्थक्षेत्र विकास आराखडा मधील विविध सुरु असलेली कामे, सुरु करायची कामे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जी कामे सुरु आहेत ती कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत.ज्या कामांना जागेची आवश्यकता आहे, त्यासाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही करण्यात यावी. भूसंपादन करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया संबंधित अधिकार्यांनी करावी,असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

 बैठकीत यमाई तलाव, कोर्टी वाखरी बाह्यवळण रस्ता, भीमा नदीवर नवीन पुल उभारणे, नवीन विश्रामगृह बांधणे,विष्णूपद बंधारा येथे घाट उभारणे आदी कामांबाबत चर्चा झाली.

  बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागांचें कार्यकारी अभियंता पी.जी. चव्हाण, अनिल ढेपे, जलसंपदा विभागांचें कार्यकारी अभियंता रमेश वाडकर, भूसंपादन अधिकारी शैलेश सुर्यवंशी, महावितरण कंपनीचे नंदकुमार सोनंदकर, आर्किटेक्ट  किरण कलमदाणी, विद्युत विभागांचें तौसिफ दारुवाले आदी उपस्थित होते.
 
Top