शेळवे,(संभाजी वाघुले ) - फेब्रुवारी महिना सुरु झाला की शिवजयंतीच्या तयारीला सुरूवात होते . सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु छञपती शिवाजी महारांजाची जयंती प्रत्येक घराघरात साजरी करावी व यंदाच्या शिवजयंतीपासून एक प्रथा पाडून घेऊ असे आवाहन सोशल मिडीयातुन शिवभक्तांनी भारतवासियांना केले आहे.

ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपुजनाला घराबाहेर सकाळी व संध्याकाळी दिवे लावतो त्याचप्रमाणे या वर्षापासून शिवजयंतीला आपण आपल्या घरी दिवे लावावेत व घरावर भगवा झेंडा लावावा.तसेच घराबाहेर रांगोळी काढावी, यामुळे शिवजयंतीच्या सणाचे महत्व आपणास व भावी पिढीस कळेल व छञपती शिवाजी महारांजाची शिकवण घराघरात रुजवली जाईल तसेच १९ फेब्रुवारी फक्त जयंती न राहता महाराष्ट्रातील एक मोठा सण व्हावा .
शिवजयंती दिनी शाळांना फक्त सुट्टी न घेता १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांप्रमाणेच १९ फेब्रुवारी शिवजयंतीचा कार्यक्रम प्रत्येक शाळेत साजरा झाला पाहीजे.

आपल्या सर्व समाजबांधवांनी या प्रथेला सुरु करण्यासाठी सर्वानी वरील प्रमाणे शिवजयंती छञपती शिवाजी महाराजांची शिकवण घराघरात व मनामनात पोहोचवणे म्हणजेच ही खरी शिवजयंती होय.अशा प्रकारे यावर्षापासून शिवजयंती हा सण साजरा करण्याचे आवाहन सोशल मिडीयातून शिवभक्तांनी भारतवासियांना केले आहे.
 
Top