मंगळवेढा - मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील युटोपियन शुगर्स या कारखान्याच्या अद्यावत तंत्रज्ञानाविषयी व आसवानी प्रकल्पाच्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेण्याकरिता महाराष्ट्र राज्य सहकार व पणन विभागाचे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या यशवंतनगर ता.कराड,जि.सातारा येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे  कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांचे समवेत कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री.यादव , सिव्हिल इंजिनीअर श्री.पाटील व यांचे सहकारी यांनी काल युटोपियन शुगर्स या कारखान्यास सदिच्छा भेट देऊन  डिस्टिलरी व इन्सिरेशन प्रकल्पा बाबत माहिती जाणून घेतली.
   यावेळी त्यांचे स्वागत युटोपियन शुगर्सचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी केले व कारखान्याच्या अद्ययावत तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. यावेळी कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख, अधिकारी वर्ग उपस्थित होता.
 
Top