मंगळवेढा - लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राणी कित्तुर चन्नम्मा स्मारक भवन समिती , सोलापूर व राष्ट्र सेविका सेविका समिती , मंगळवेढा यांचेवतीने मंगळवेढा येथील नगर वाचन मंदिरच्या हॉलमधे "पूर्ण पुरुष लोकमान्य टिळक"
या विषयावर पंढरपूरच्या समिती सेविका, बौद्धीक प्रमुख श्रीमती मानसी केसकर यांचे व्याख्यान संपन्न झाले .


लोकमान्य टिळकांची पत्रकारिता, त्यांच्या वकिली
व्यवसायातील लोकाभिमुखता, त्यांचे अध्यात्मिक
अलौकित्व,सामाजिक व शैक्षणिक लोकजागृतीचे कार्य या सर्व पैलूंवर त्यांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला.
लो.टिळक,वंदनीय भारतमाता, वं. केळकर मावशी, वं ताई आपटे यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. ताम्हणकर ताईंनी समितीचे गीत म्हटले. सौ. श्रद्धा रत्नपारखी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर सौ. बडोदकर ताईंच्या हस्ते मानसीताईंचा संत दामाजीपंतांची मूर्ती व फुल श्रीफल देऊन सत्कार केला. त्यानंतर पंढरपूरहून खास कार्यक्रमासाठी उपस्थित समिती सेविका,पंढरपूर शहर
कार्यवाहीका सौ.भक्ती नातू, सौ.वैशाली आठवले, सौ.रुक्मिणी देशपांडे, सौ.लता बहिरट यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सौ.श्रद्धा कुलकर्णी यांनी केले. ऋणनिर्देश व वंदेमातरम् डॉ.सौ.देवयानी देशमुख, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष यांनी म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगळवेढा समितीच्या सहकार्यवाहिका सुरेखाताई नाडगौडा यांनी
केले. कार्यक्रम संपन्न होण्यासाठी मंगळवेढा रा. से. समितीच्या सर्व भगिनींनी सहकार्य केले.
उपस्थित सर्व भगिनींना तिळगुळ देवून कार्यक्रमाची सांगता झाली.
 
Top