पंढरपूर (प्रतिनिधी ) - पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील विश्वास भागवत यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी भाळवणीतील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
भाळवणी येथील ब्रम्हचैतन्य स्टेशनरी दुकाना समोर तुकाराम आप्पा बंडगर (वय २७,रा.
केसकरवाडी, ता. पंढरपुर) व त्याचे सहकारी संतोष दतात्रय पाटील, प्रविण उर्फ बाजीराव गायकवाड, दतात्रय मारुती माने, चंद्रकांत रामलिंग देशमुख, गोरख गणपत लिंगे हे सर्वजण गप्पा मारत बसले असताना विक्रमसिंह भिकु म्हमाणे आणि ऋषिकेश उर्फ गणेश दत्तात्रय ताड दोघे रा. भाळवणी हे काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल वरुन तिथे आले. विक्रमसिंह भिकु म्हमाणे याने हातातील पिस्तुलने विश्वास भागवत याचेवर गोळी झाडुन त्यास तु आमच्या जमीनीचे पैसे आम्हांस मागतो का? असे म्हणून विश्वास उर्फ बापू बबन भागवत यांचा खून केला. तेव्हा तुकाराम बंडगर हा पाठीमागे पळाला असता तुकाराम याचेवर पिस्तुलचा फायर करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुकाराम आप्पा बंडगर सोडवा- सोडवी करीत असताना विक्रमसिंह याने तुकाराम बंडगर यास तुझपण बघतो, तु वाचलाय असे म्हणाला आणि तुकाराम यास मागुन जोरात ओढले व हाताच्या मुक्क्याने मारुन खाली पाडले. नंतर ते दोघे मोटर सायकलवरून पळून गेले. सदर घडल्या प्रकाराबाबत तुकाराम आप्पा बंडगर (वय २७, रा. केसकरवाडी, ता. पंढरपुर) यांनी पंढरपुर ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित आरोपी विक्रमसिंह भिकु म्हमाणे व ऋषिकेश उर्फ गणेश दत्तात्रय ताड यांचेविरुध्द फिर्याद दाखल केली होती. त्यावरून पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वेगाने तपास करून गुन्हा घडले पासुन २४ तासांचे आत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये गुन्ह्यातील आरोपी विक्रमसिंह भिक म्हमाणे यास अटक करण्यात आली असुन ऋषीकेश उर्फ गणेश दत्तात्रय ताड हा अल्पवयीन असल्याने त्यास ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे , स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत आणि त्यांचे पथक यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत भस्मे, पोसई खान, पोसई उमाप, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व त्यांचे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी, पंढरपूर पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. खरात, पोलीस ग्रामीण ठाण्याचे सपोफौ प्रकाश मोरे ,सपोफौ काशिनाथ माने ,सपोफौ मारुती दिवसे, पोहेकॉ स्वप्नील वाडदेकर ,पोहेकॉ शेख ,पो.ना. जाधव ,पो.ना. सय्यद ,पो.कॉ. सुर्वे, पो.कॉ. नलवडे ,पो. कॉ.मुलाणी,पो.कॉ अडत, पो.कॉ बाबर ,चा.पो.कॉ. थोरात तसेच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो.ना.मोरे ,पो.ना.भोसले ,पो.ना. ताटे,पो.कॉ. ठाणेकर, पो.हे.कॉ.पवार यांनी परिश्रम घेतले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करीत आहेत.
 
Top