पंढरपूर - सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये एस.पी. मनोज पाटील यांच्या पोलीसिंगच्या वेगवेगळ्या निकषानुसार असलेल्या आदर्श गुणांकन पद्धती मध्ये सण २०१९ या संपूर्ण वर्षात सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचा प्रथम क्रमांक आलेला आहे.

 

 पंढरपूर शहर पोलीस ठाण्यास मिळालेला हा बहुमान आपला सर्वांचा असल्याने मी तो बहुमान माझ्यासोबत कर्तव्य करत असलेल्या पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना तसेच सर्व पंढरपूरकरांना समर्पित करीत आहे असे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले.

   सन २०१९ मध्ये पंढरपूर शहर पोलीस स्टेशन प्रत्येक निकषावर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे त्यामध्ये गुन्हे प्रतिबंध, गुन्हे उघडकीस आणणे, गुन्ह्यात चोरी गेलेली प्रॉपर्टी हस्तगत करणे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करणे, चांगल्या प्रकारचा जनसंपर्क ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, जनतेला पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, कम्युनिटी पोलिसिंग, जनतेला उपयोगी पडतील असे सामाजिक उपक्रम राबवणे, पोलीस जनता संबंध सुधारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आखणे, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालणे, तसेच महिला अत्याचाराच्या घडलेल्या घटनेबाबत संवेदनशील राहून त्यातील गुन्हेगारावर परिणाम कारक कारवाई करणे,पोलिस ठाण्यातील प्रशासकीय कामकाज आणि पोलीस कल्याणकारी योजना राबविणे, या सर्व निकषां मध्ये पंढरपूर शहर पोलीस ठाणे आघाडीवर असल्याचे दिसून आल्याने एस.पी. मनोज पाटील यांनी पंढरपूर शहर पोलीस पोलिस ठाण्यास प्रथम क्रमांक देऊन आज २६ जानेवारी प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
 
Top