नवी दिल्ली,२५ जानेवारी - ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून 'पद्मश्री' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जुन्या वाणांची जपणूक करणार्‍या बीजमाता राहीबाई पोपेरे आणि हिवरे बाजार गावाला आदर्श गाव करणाऱ्या पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत मान्यवरांना पद्मश्री सन्मान करण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या एका आदिवासी महिलेला पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. राहीबाईंनी ५३ विविध जातीच्या देशी वाणांच्या ११३ जातीचं संवर्धन केलं. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरन्वित करण्यात आले आहे.
 
Top