टेंभुर्णी - सोलपुर, पुणे, उस्मानाबाद, सातारा, अहमदनगर, बीड जिल्ह्यातील जैन धर्मियांचे व युवक युवतींचे प्रतिनिधित्व करणारी संघटना श्री सन्मती सेवा दलाच्या १५० स्वयंसेवकांनी झारखण्ड राज्यातील जैन धर्मियांचे काशी म्हणून ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी पहाड़ावर २६ जानेवारी रोजी स्वच्छता अभियान राबवित शेकडो किलो कचरा नष्ट करत जमिनी पासून ४ हजार २०० फुट ऊंच असलेल्या पारसनाथ, गौतम गणधर (टोक) पहाड़ावर तिरंगा ध्वज फड़काविला तसेच सामूहिक राष्ट्रगीत गायन केले. स्वयंसेवकांसोबत स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते.या सर्वांनी प्लास्टिक ,बिस्किट पूड़ेचे कागद, पाणी बाटली, नारळ केसर आदि शेकडो किलो कचऱ्याची विल्हेवाट लावली.


श्री सन्मती सेवा दलमार्फत गेल्या ८ वर्षांपासून श्री तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियान राबविले जात आहे, पहिल्या वर्षी फक्त १५ सदस्यांवर हे स्वच्छता अभियान सुरु झाले होते.


स्वच्छतेचे महत्व जाणून श्री सन्मती सेवा दलाने "स्वच्छतेतुन ईश्वरभक्तिकडे" हे धोरण अवलम्बवुन स्वच्छता अभियान सुरु केले. या माध्यमातून ग्रामीण भागातील जैन धर्मियासाठी शिखरजीची वंदना करण्याचे स्वप्न श्री सन्मती दलाने सत्यात उतरवले. आज पर्यन्त स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने हजारो जैन बांधवांची अल्प दरात श्री सम्मेद शिखरजी यात्रा झाली आहे, यापुढील काळातही हे कार्य अखण्डित चालु राहणार असल्याचेही संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी यांनी सांगितले.


 श्री सन्मती दलाने सम्मेद शिखरजीचा अवघड पहाड़ सुमारे सव्वा तीनशे जणांनी एकत्रित येवून स्वच्छ केला,या कार्याची दखल घेवून  गोल्डन बुक मधेही याची नोंद झाली आहे.

अभियान यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी, विद्यमान अध्यक्ष मयुर गांधी, संदेश दोशी, प्रज्योत गांधी, जिनेंद्र दोशी, नवजीवन दोशी, संदेश गांधी, विरकुमार दोशी,यशराज गांधी, केतन दोशी, नमन गांधी, योगराज गांधी आदिंनी परिश्रम घेतले. 
 
Top