पंढरपूर- महाराष्ट्र राज्य मराठा सोयरिक ग्रुपच्या वतीने भव्य राज्यस्तरीय विनाशूल्क वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दि.२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत श्री संत जगत्‌गुरू तुकाराम महाराज मंगल कार्यालय, इसबावी, जुना अकलूज रोड, पंढरपूर येथे आयोजन करण्यात आलेला आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी व वधु-वरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.


विवाह जमविणे सध्याच्या काळात मोठी समस्या बनली आहे. या संधीचे सोने करून घेण्यासाठी व्यावसायिक वधु-वर सूचक मंडळांनी विवाह जुळविण्यासाठी दलालांची कंबर कसली आहे. गरजवंत वधू व वर पालकांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारून त्यांची लूट करण्याचा धंदा अनेकां कडून केला जात आहे. या लुटमार फसवणूक करणाऱ्याची गय न करता त्यांना धडा शिकविणार असल्याचे महाराष्ट्र मराठा सोयरिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जवंजाळ पाटील (बुलडाणा) यांनी वधू-वर सुचक मंडळाच्या माध्यमातून गरजवंत पालकांची फसवणूक करणाऱ्या दलालांना पायबंद बसणार आहे. यासाठी विनाशूल्क वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या बैठकीस अभिजीत पाटील, राजेंद्र कोरके-पाटील, डॉ.उदयसिंह पवार, रामदास गाजरे, संदिप गाजरे, विजय घालमे, दत्तात्रय यादव, राजेंद्र गुंड, रविंद्र माने, नंदकुमार सटाले, दत्ताजीराव पाटील,राधेश बादले पाटील यांच्यासह मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.
 
Top