पंढरपूर - भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त केसांमध्ये भारत देशाचा नकाशा येथील ओके हेअर ड्रेसेसचे मालक तुकाराम धोंडीबा चव्हाण यांनी हुबेहुब कोरून सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या अनोख्या पध्दतीने शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कलाकृतीचे कौतुक होत आहे.
तुकाराम चव्हाण यांनी यापूर्वी श्री विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, भारत देश विश्वचषक जिंकल्यानंतर विश्वचषक यांच्या केसांमध्ये प्रतिकृती साकारून आगळ्या वेगळ्या पध्दतीने देशाविषयी व महापुरूषांमध्ये भारतीय नागरिकांमध्ये अभिमान जागृत करण्याचे काम केलेले आहे.
 
Top