जखमी तरस  उपचारासाठी सोलापूरला रवाना शिकारीसाठी वापरणाऱ्या सापळ्याच गूढ कायम
नातेपुते ,(श्रीकांत बाविस्कर)- माळशिरस तालुक्यातील तांबेवाडी येथील शिवारात कॅनॉल च्या पाणी सोडण्याच्या दारातील मोरीमध्ये जखमी अवस्थेत तरस आढळून आला .ग्रामस्थांनी वनविभागाला कळवताच तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी आय. ए. एच. शेख आपल्या पथकासह पोहोचले तातडीने तरसवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम उपचार करून सुरक्षित पिंजर्‍यात पकडण्यात आले. मात्र या तरसाच्या पायाला शिकारी सापळ्यामुळे या प्राण्याची शिकार करण्याच्या उद्देश असल्याचे लक्षात आले त्यामुळे वन विभागाने अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील उपचारासाठी तरस सोलापूर प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
   एक वर्ष वयाचा तरस हा प्राणी या परिसरात फिरत असताना शिकारी सापळ्यामध्ये पाय अडकल्यामुळे जखमी अवस्थेत आढळल्याची माहिती तांबेवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दादा चव्हाण यांनी वन विभागाकडे दिली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी आय ए एच शेख, वन परिमंडळ अधिकारी एस एस क्षीरसागर, वनरक्षक एच व्ही साळुंके, सचिन जोशी यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली व जय क्षीरसागर, ज्ञानेश्वर बोडरे ,सुमित बजबळकर ,अजय होळ , तानाजी बोडरे, आनंद दहिवाळ आदी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी तरस पिंजऱ्यात बंद करण्यात आले यानंतर उपचार केले असून पुढील उपचारा साठी सोलापूरच्या प्राणिसंग्रहालयाकडे पाठविण्यात आले असून याबाबत वन विभागाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध वन्यजीव अधिनियम १९७२ च्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
विशिष्ट पद्धतीच्या शिकारी सापडल्याचे गुढ कायम
जखमी तरसाच्या पायामध्ये विशिष्ट प्रकारचा शिकारी सापळा सापडला असून हा सापळा प्रामुख्याने हिंस्र प्राण्यांच्या शिकारीसाठी मराठवाडा विदर्भात वापरला जातो. हा सापळा माळशिरस तालुक्यात वापरात आल्यामुळे या प्रकाराचे गूढ वाढले आहे. कारण या परिसरात कोणतेही प्राणी आढळत नाहीत. या भागात काही ठिकाणी हरणांचे अस्तित्व असले तरी हा सापळा त्यांच्या शिकारीसाठी उपयुक्त ठरत नाही त्यामुळे हा सापळा प्रथमच या भागात आढळून आला असून वन विभाग याची कसून तपासणी करीत आहे .
 
Top