गावठी धक्का :

वारसदार हेच सूत्रधार पात्रता असों वा नसो
त्यांना एकच नंबर म्हणायचं असतं
मानापमान विसरून सारं सोसायच असतं
आता कसं विचारले की "आपण म्हणताल तसं "
म्हणतं म्हणतंआपलं साधवायच असतं 
नको तें धुणे धुवायचे नसतं 
कौशल्याने खेळवायच असतं "!!

 गावरान चिमटा :

एकमेकांवर हल्लाबोल करणारे 
सत्तेत भागीदार होताच एकमेकांच्या स्तुतीत 
गुंतलेलें दिसतं आहेत हा सत्तेचा प्रभाव आहे 
नीतीचा मात्र सर्वत्रच अभाव आहे "!!

आनंद कोठडीया ,जेऊर , ९४०४६९२२००

 
Top