शाश्वत विकास उद्दिष्टे व महिला सक्षमीकरण: बिजींग +२५ व जागतिक महिला आयोग सत्र ६४ माहिती व कृती कार्यशाळाचे उपसभापती विधानपरिषद यांच्यावतीने आयोजन
मुंबई दि.२८ : बिजींग येथील चौथ्या विश्व महिला संमेलनास आँगस्ट २०२० मध्ये २५ वर्ष पूर्ण होत आहेत या अनुषंगाने दि. २९ जानेवारी २०२० बुधवार , दालन क्र.१४५, पहिला मजला, विधान भवन, मुंबई येथे सकाळी ११ ते सायं ५ यावेळेत निमंत्रितांसाठी कार्यशाळेचे आयोजन उपसभापती विधानपरिषद कार्यालय यांनी आयोजित केली आहे. बिजींग येथील चौथ्या विश्व महिला संमेलनास २५ वर्षे पूर्ण होत असल्याने राज्य व देशपातळीवरील झालेली प्रगती आणि त्याबाबतची आव्हाने याबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन होत आहे. यासंदर्भात स्त्री आधार केंद्र, पुणे आणि डी.एस.टी, पुणे (Development Support Team, Pune) च्यावतीने Task Force India (4th WWC Bijing+25) चर्चासत्राचे डिसेंबर २०१९ आयोजन करण्यात आले होते. दि.२९ जानेवारी २०२०, बुधवारची कार्यशाळा या दोन्ही संस्थांच्या सोबतच ट्रान्स एशियन चेंबर आँफ काँमर्स अँड ईंडंस्ट्रीज ,मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित केले आहे.

बिजींग विश्व संमेलनास २५ पूर्ण होताना मागील काळाचा अभ्यास केला तर यूएन महिला आयोगाशी सामाजिक संस्थांचे सहयोग आणि संवाद असे नाते राहिले आहेत. यूएन महिला आयोग हे परस्परसंवादी मंच आहे. याठिकाणी राजनिती व समाजकारण एकत्रच होते कारण विविध देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या जागतिक शिखर परिषदा तेथे अनेक विषयावर होतात. या दरम्यान विकसनशील देशांच्या राजनिती आणि गरीब देशांच्या राजनितीचा संबंध हा महिला, बालक, रोजगार निर्मिती अशा विषया वर संवाद साधण्याचे काम यूएन मंच करत असतो.

१९९४ साली झालेल्या पहिल्या महाराष्ट्र राज्य महिला धोरणावरती कृती कार्यक्रम १९९८ साली युती सरकारने जाहीर केला होता.

यात चार गट चर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या गटचर्चांचे विषय १.महिला व बाल विरोधी होणारा हिंसाचार : कार्यप्रणाली व कृती, २.महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग व महिला प्रश्नांचा अजेंडा, ३. हवामान बदल, शाश्वत विकासाची उद्दिष्टे व सामाजिक सहभागातून उत्तम कार्यपद्धतीची उदाहरणे, ४. शासनाची धोरणे व स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक सहभागाच्या दिशा यावर चर्चा होणार असून विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र राज्याकडून झालेली मांडणी आम्हाला मार्च २०२० न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संमेलनात तसेच जुलै मध्ये होणाऱ्या अन्य जागतिक व्यासपीठात उपयुक्त ठरू शकेल. या बैठकीस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कृषी मंत्री दादा भुसे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, देवशीष चक्रवर्ती, नियोजन - अपर मुख्य सचिव, संजय कुमार, गृह-अपर मुख्य सचिव, अरविंद कुमार, ग्रामविकास-अपर मुख्य सचिव, अनिल डिग्गीकर, पर्यावरण-प्रधान सचिव, मनीषा वर्मा, प्रधान सचिव-आदिवासी विकास विभाग, श्वेता सिंघल-अतिरिक्त विभागीय आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री विविध व विविध दूतावासांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहून निमंत्रितांना मार्गदर्शन करणार आहेत.
 
Top