नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर) - सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीर मौजे लोणंद येथे सुरू आहे . या शिबीरात व्याख्यानाचे ५ वे पुष्प गुफंताना  "आधुनिक तंत्रज्ञान व ग्रामविकास "या विषयावर  प्रमुख वक्ते म्हणून विजय पिसाळ बोलत होते . 
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.एस.डी.गोडसे होते . 
    पुढे बोलताना विजय पिसाळ म्हणाले की , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, ग्रामविकास साधने शक्य आहे . गट शेती,कृषी औजारे व बियाणे बँका,शेतकरी बचत गट निर्माण करून गावातील उत्पादीत कच्चा मालावर याच ठिकाणी प्रक्रिया करून तो बाजारपेठेत पाठवला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन, विपनन, विक्री केली पाहिजे. प्रक्रिया उद्योग सुरू करून शेतमालाचे मुल्य संवर्धन केले पाहिजे.गावातील बेरोजगार तरूणांच्या हाताला काम दिले पाहिजे . ग्रामीण भागात खर्या अर्थाने समाज परिवर्तन व नवतंत्रज्ञान विकसित करायचे असेल तर समाज मंदिरं बांधण्याऐवजी गावागावात वाचनालये व ग्रंथालये निर्माण झाली पाहिजे.संरक्षित पाणीसाठे , शेततळी निर्माण करून फळबागांची लागवड केली पाहिजे.शासनाच्या विविध योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. 
   हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.थोरात,प्रा. पवार,प्रा.सौ.गांधले मॅडम यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते .
 
Top