नूतन बांधकाम सभापती विक्रम शिरसट यांचे नागरिकांमधून कौतुक!
पंढरपूर - सरगम थिएटर जवळील रेल्वे पुला खालील रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने पंढरपूर व परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पंढरपूर शहरातील सरगम थिएटर व इसबवी वाखरी कडे जाताना रेल्वे पूल लागतो त्या पुलाखाली अनेक वर्षापासून खड्डे पडल्याने पावसाचे पाणी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात साठले जात होते.पावसाळ्यामध्ये नागरिकांना या प्रमुख मार्गावरून ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती, अशा परिस्थितीमूळे लोक हैराण झाले होते.
अनेक वर्षापासूनची ही परिस्थिती लक्षात घेता पंढरपूर नगरपालिकेचे नूतन बांधकाम सभापती विक्रम शिरसट यांनी बांधकाम समितीच्या सभापती विराजमान होताच सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच दिवशी सदर रस्त्याची पाहणी करून लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना बोलाऊन रस्त्याची पाहणी करून अनेक वर्षापासून रखडलेले काम व जनतेचे होणारे हाल लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना तात्काळ सदरचा रस्ता दुरुस्ती करून चांगल्या प्रकारचा रस्ता बनवून लोकांची होणारी गैरसोय लवकर टाळावी व सदर मार्ग जनतेसाठी खुला करून द्यावा अशा सूचना दिल्या. सभापतींचे मार्गदर्शना खाली तात्काळ बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी यांनी सदरच्या रस्त्याचे काम सुरू केले आहे.
हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल व चांगल्या पद्धतीचा रस्ता नागरिकांसाठी सुरू होईल यामुळे पंढरपूर शहरातील व परिसरातील लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे व पंढरपूर नगर परिषदेचे नूतन सभापती विक्रम शिरसट यांचे कौतुक होत आहे.
 
Top