पंढरपूर ,(प्रतिनिधी)- पंढरपूर शहरातील नगरपालिका  व प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत चार ते पाच हजार घर प्रकल्प बांधणे चालू आहे त्यातील पहिला टप्प्यातील ८९२ घरांचे काम चालू आहे, सदर प्रकल्प ज्या जागेत म्हणजे जुना कचरा डेपोच्या जागेवर हा प्रकल्प उभारणे चालू आहे .ती जागा पूर प्रवण क्षेत्रांमध्ये येत असून नागरिकांना आगीतून उठून फुफाट्यात पडल्या सारखी अवस्था होणार आहे. 
कारण पंढरपूर शहरात ज्या ज्या वेळी पूर आलेला आहे,त्या त्या वेळी गोपाळपूर नाल्यातून कचरा डेपोचा भाग पुर्ण पाण्याखाली गेला आहे . आणि पुन्हा त्याच जागेवर बेघर कुटूंबियांना घर बांधून देण्याचा काय उपयोग आहे हा प्रश्न निर्माण होतोय,तरी कचरा डेपो येथे होणारा घर प्रकल्प बंद करून सुरक्षित शासकीय जागेवर हलवण्यात यावा,केंद्र व राज्य शासनाने २.५० लाख रूपये अनुदान दिले जाणार आहे.व उर्वरित रक्कम बँकामार्फत नागरिकांना कर्ज काढुन देण्यात येणार आहे, त्या पंढरपूर शहरातील नागरिकांची फसवणूक होवू नये व शासनाचा करोडोंचा निधी चुकीच्या ठिकाणी वापरला जावू नये,सदर जर प्रकल्प दुस-या सुरक्षित शासकीय जागेवर न हलविण्यास त्याच ठिकाणी पुर्ण केल्यास त्या न प्रकल्पाविरोधात  झोपडपट्टीवासीयांना वैयक्तिक जागेवर प्रधानमंत्री आवास योजना घरकुल देण्याची मागणी केली आहे व शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरासमोर बेमुदत अमरण उपोषण केले जाईल, किंवा पंढरपूर प्रांतकार्यालयासमोर बेमुदत अमर उपोषण केले जाईल,असे निवेदन पंढरपूर प्रांतअधिकारी सचिन ढोले यांना निवेदन दिले आहे.  
यावेळी शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदिप मांडवे, आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे सागर कदम,देवराज युवा मंचाचे अध्यक्ष शहाजी शिंदे,ओ.बी.सी.काँग्रेस सेलचे मधुकर फलटणकर,राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी अध्यक्ष राकेश सांळुखे, विजय मोरे,सागर कावरे,औकार चव्हाण,किरण शिंदे,अजय गुंड,विष्णू देवमारे, यश घोडके, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top