पंढरपूर - मातोश्री सौ.सरूबाई माने माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व मातोश्री गुरूकुल मधील विद्यार्थी देशातील विविध विभागात कार्य करीत असून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम माने बंधू उत्तमरित्या करीत असल्याचे मत मा.आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी व्यक्त केले.
भटुंबरे येथील सौ.सरूबाई माने माध्य.विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व मातोश्री गुरूकुलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अँड.वामनराव माने, संस्थेचे सचिव तथा जि.प.सदस्य सुभाष माने, डॉ.प्रतापसिंह माने, उपसरपंच विजयसिंह माने, मातोश्री गुरूकुलचे प्रमुख विक्रमसिंह माने आदि उपस्थित होते.
   अध्यक्षीय भाषणात अँड.वामनराव माने म्हणाले की, देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याचे काम शाळा करीत असते. नेताजी शिक्षण प्रसारक मंडळाने भटुंबरे व भैरवनाथवाडी येथील शाळांनी विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे .
प्रारंभी प्राचार्य उत्तम कोकरे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी संस्थेचे संचालक प्रा.हणमंत लोंढे, आगतराव तरंगे, चंद्रकांत देशमुख, प्राचार्य उत्तम लवटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
 
Top