टोलनाका :

देशसेवेला निमंत्रण हवे कशाला
श्रमदानास मानधन पाहिजे कशाला !!
 सुसंस्कृत वागण्यास वेळ  कशाला 
     दुसऱ्याना नांव ठेवायची कशाला!!
हिशोब आपला ठेवण्यास कायदा  कशाला 
पारदर्शक असेल तर भीती कशाला !!
     आपलं उत्पन्न झाकून कशाला 
     तपशील देण्यास उशीर कशाला !!
जमाखर्च आयुष्याचा मांडणार् केंव्हा 
चारित्र्याला गौरवशाली करणार केंव्हा !!


 पंचनामा :

पत असेल तर ,जात असेल तर 
पैसा असेल तर ,दहशत असेल तर
पक्ष असेल तर , लाचारी असेल तर 
मग फक्त निवडणूक सहज सोपी सुलभ जाते......
गुणवत्ता लायकी असों वा नसो  
सत्तेत स्थान मान मिळतो पण 
कान मात्र श्रेष्ठींच्या हाती असतो ....
असं हे राजकारणं असतं .....

आनंद कोठडीया , जेऊर ९४०४६९२२००


 
Top