शोक संदेश 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व माझी मैत्रिण श्रीमती विद्या बाळ यांचे दु:खद आणि व धक्कादायक निधन झालेले आहे. गेले काही दिवस प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना त्रास होत होता. त्यांची भेट नुकतीच मी हॉस्पीटलमध्ये घेतली होती. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती व संवेदनशिल मन, सिध्दहस्त लेखणी तसेच माणसांशी अत्यंत प्रेमाने संवाद करण्याची मानसिकता अशा अनेक त्यांच्या व्यक्तीमत्वाची  वैशिष्ठ्ये होती. त्यांनी आणि मी जवळजवळ ४५ वर्षे बरोबर काम केलेले आहे. अनेक ठिकाणी प्रवास केला ,अनेक परिषदांमध्ये गेलो अनेक संघटना उभ्या केल्या. अनेक ठिकाणी आम्ही अनेक प्रश्नांवर बरोबरीने आवाज उठवला होता. 
सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांचे कार्य होते .
सर्व ठिकाणी टॉर्च बेअरर म्हणता येईल की पुढे मशाल घेऊन नेणारी व्यक्ती असते तशा त्या जागल्याच्या भुमिकेत होत्या.
 विशेषत: सर्व महिलांमध्ये स्वत:ची ओळख करून देण्यासाठी म्हणून त्यांनी एक वेगळा प्रवास केला व त्यात अनेक महिलांना सहभागी करून घेतले होते. त्यांच्या निधनामुळे माझी वैयक्तिक हानी झालेली आहे. सामाजिक संघटनामध्ये सुध्दा त्यांचे काम कायम अविस्मरणीय राहिल.मी स्त्री आधार केंद्राची अध्यक्ष, शिवसेनेची उपनेता व प्रवक्ता तसेच विधानपरिषदेची उप सभापती या नात्याने श्रद्धांजली व्यक्त करते.
 स्त्रिया आकाश पेलायला निघतात, अशा वेळेला त्यामधला एक मोठा आधार निखळलेला आहे.  त्यांच्या कार्यातून अनेक स्त्रियांना कायम प्रेरणा मिळत राहिल अशा प्रकारे निश्चितपणाने संकल्प मनामध्ये ठेवते.
 
Top