मंगळवेढा - भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त आज युटोपियन शुगर्स लिमिटेड पंतनगर कचरेवाडी तालुका मंगळवेढा येथे युटोपीयन शुगर्स चे मार्गदर्शक सी. एन देशपांडे यांचे हस्ते व कारखान्याच चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक  उत्तमराव पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.


यावेळी बोलताना सी एन देशपांडे  म्हणाले की, युटोपीयन शुगर्सने विविध क्षेत्रांमध्ये अल्पावधीतच आपल्या कर्तुत्वाने यशाचा झेंडा फडकवला आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय  तिरंगा ज्याप्रमाणे ताठ मानेने डौलतआहे त्याच प्रमाणे युटोपीयनच्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा ही असाच फडकत राहावा हीच आशा व्यक्त करतो व  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी आपणास शुभेच्छा देतो.

यावेळी कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, युटोपीयन शुगर्स हा चालू गळीत हंगामामध्ये आपले अपेक्षित उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण करेल. काही दिवसातच इतकी प्रगती साधणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असून त्या कर्मचाऱ्यांना भरघोस पगार वाढ लवकरच करणार आहोत.
  कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने जिल्ह्यातील काही मोजकेच कारखाने पूर्णक्षमतेने चालवण्यात येत आहेत . त्यामध्ये आपला युटोपियन शुगर्स समाविष्ट आहे. आजपर्यंत आपल्या कारखान्यावर ऊस उत्पादक यांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीकच यानिमित्ताने सिद्ध होते आहे. 
  यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांनीही उपस्थितांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पांढरे यांनी केले
छायाचित्रे:-सागर राजमाने
 
Top