पंढरपूर , प्रतिनिधी- स्व. उमेशचंद्र खेडकर मित्र परिवारांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरची स्पर्धा ही येत्या ८ डिंसेबर २०१९ रोजी येथील लोकमान्य विद्यालयात होईल. प्राथमिक आणि माध्यमिक अशा चार गटांमधे स्पर्धा होणार आहे. अशी माहीती प्रशांत वांगीकर आणि गणेश धांडोरे यांनी दिली आहे.

    स्व. उमेशचंद्र खेडकर याच्या सातव्या स्मृती दिनानिमित्त जिल्हास्तरीय उमेशचंद्र स्मृती वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरची स्पर्धा ही प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटात होणार आहे. यामधे प्राथमिक गट हा पहिली आणि दुसरीचा असा गट असणार आहे. या गटासाठी विषयांचे कुठलेही बंधन नाही. तर दुसरा गट हा ३ री आणि ४ थीचा असणार आहे. या गटासाठी प्राणी आमचे मित्र , मला पडलेले स्वप्न , माझी आवडती व्यक्ती , सुटटीतील मज्जा आणि स्पर्धा स्वतःशी कि मित्र-मैत्रिणींशी असे विषय देण्यात आलेले आहेत. यासाठी ४ मिनिटांचा वेळ देण्यात आलेले आहे.
  
   माध्यमिक विभागात ५ वी ते ७ वीचा पहीला गट आहे.यामधे टचस्क्रीनच्या मैदानात हरवलेली पिढी , मला भावलेली क्रिडा क्षेत्रातील हिरकणी , महापूर- निसर्गनिर्मित कि मानवनिर्मित , पिठलं भाकरी कि पिझा बर्गर ,हसण्यासाठी जन्म आपुला असे विषय देण्यात आलेले आहेत. या गटासाठी ५ मिनिटांचा वेळ निर्धारीत करण्यात आलेला आहे.

  याशिवाय ८ वी ते १० गटांसाठी कलम ३७० काल-आज-उद्या ,ऑनलाईन शॉपिग फ्ढायदा कुणाचा?, राष्ट्रतेज-अटलजी , चांद्रयान - यश अपयश , मुकी होत चाललेली घरं असे विषय देण्यात आलेले आहेत. या गटासाठी ७ मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे.

  सदरच्या चारही गटांच्या स्पर्धा ८ डिंसेबर रोजी दिवसभर लोकमान्य विद्यालयात होणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात सकाळी ९ वाजता होणार आहे. स्पर्धेनंतर लगेचच विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असणार आहे. यासाठी दिपक इरकल 9403293291 , सोमनाथ गायकवाड8805629046 , शशिकांत कराळे 9763388311 आणि संकेत कुलकर्णी 9970161101 या क्रमांकावर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी राजेश शहा ,डॉ प्रविदत्त वांगीकर,डॉ गिरनार गवळी,डॉ सचिन लादे ,अमित वाडेकर,डॉ आकाश रेपाळ ,सचिन मेलगे ,राम मोरे ,प्रताप चव्हाण , मंदार केसकर ,विनया उत्पात आदी नियोजन करीत आहेत.
 
Top