मरण येईस्तो जगायचे मग 
रणांगण सोडायचे कशाला ?
सत्याची कास धरायची तर 
सावलीच्या पाठीशी धावायचे कशाला ?
स्वावलंबनाने जीवन घडवायचे मग 
अनुदानासाठी नादान व्हायचे कशाला ?
प्रेमाने जग जिंकायचे तर शत्रुत्व घ्यायचे कशाला?
हाताला येत नाही म्हणून आंबट म्हणायचे कशाला
चंदनासारखे सुगंधी उद्बत्तीप्रमाणे परोपकारी
जगायचे तर मग लालसा कशाला ?
हसत खेळत  जगायचे तर 
कण्हत बसायचे कशाला 
माणूस म्हणून जगायचे, जाताना हात रिकामेच 
मग लोभ धरायचा कशाला ?राजकारणात खरं कांहीच नसतं 
जे सोयीच तेच खरं असतं 
शक्ती असल तेवढंच पचत
नको तेवढं केलं की अंगालट येत 
कारण नसतांना दुखण वाढत "!!

आनंद कोठडीया,९४०४६९२२००


 
Top