पंढरपूर - नागरिकांना विविध सेवासुविधा देणेकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्या अनुषंगाने पंढरपूर नगरपरिषदेच्या नागरी सुविधा केंद्रामार्फत  मालमत्ता कर भरणेकरिता ऑनलाईन सेवा कार्यरत केलेली आहे त्यामुळे नागरीकांनी व्यक्तीश: नगरपरिषदेमध्ये येणेची गरज नाही. नागरीकांनी घर बसल्या पंढरपूर नगरपरिषदेची वेबसाईट www. pandharpurmc.org या संकेतस्थळास भेट देवुन आपल्या शहर हद्दीतील मालमत्तेची थकबाकी पाहून त्यांना तात्काळ सदरचा मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरणेकरिता पंढरपूर नगरपरिषदेने ऑनलाईन पेमेंट करणेची सुविधा सुरु केलेली आहे. नागरिकांनी कोणतीही कॅश न बाळगता आपल्या डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड मार्फतदेखील पंढरपूर नगपरिषदेमध्ये येवून मालमत्ता कर भरणेकरिता POS मशीन (Swipe  मशीन) सोय करण्यात आलेली आहे.नागरिकांनी QR कोड स्कॅनरचा वापर करुन पेटीएम, गुगल पे,भिम अँप इ.सारख्या अन्य कोणत्याही युपीआय अँपद्वारे पंढरपूर नगरपरिदेचा मालमत्तेचा कर भरता येणार आहे. त्यासाठी नागरी सुविधा केंद्रामध्ये QR कोड लावण्यात आलेला आहे.

    सदरच्या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी केले. हि सेवा सुरु करणेकरिता नगरपरिषदेचे संगणक अभियंता (नोडल ऑफीसर) अनुप भुमकर, सहा.नोडल ऑफीसर पराग डोंगरे, ABM Knowladgeware सॉफ्टवेअर कंपनीचे Functional Counsultant श्रीकांत कुलकर्णी, शेखर कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. या सेवेकरिता HDFC बँकेकडुन पेमेंट गेटवे घेण्यात आलेले आहे.  
 
Top