पंढरपूर नगरपरिषदेने नागरीकांच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३१९२३ हा नंबर सुरु केलेला आहे. नागरीकांनी आपल्या असणा-या विविध तक्रारी या टोल फ्री नंबर वर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत तक्रारी दिल्यास तात्काळ त्या तक्रारींची दखल घेवून तक्रारीचे निराकरण करणे सोईचे होणार आहे. त्यामुळे नागरीकांनी आपल्या विविध असणा-या तक्रारी या पंढरपूर नगरपरिषदेच्या टोल फ्री क्रमांकावर करण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी केले आहे.  
 
Top