शोधूनही भेटेना प्रामाणिक माणूस येथे 
पाय रक्तबंबाळ झाले जागोजागी काटेच येथे !!

वटलेले वृक्ष जरी हजारो राजकीय झेंडे नांदतात येथे 
स्थलांतर पक्षांतर रोजचे व्यवहार कोणा विधि निषेध येथे !!

जाईल तिथे बाजार पैशाचा दलालांचा सुळसुळाट येथे 
अनैतिकता माजलेली रानोमाळ सत्याग्रही दुर्मिळ येथे !!

शिक्षण धंदा जोरात नेतेच अधिपती संस्थाचे 
येथे संस्कार प्रामाणिकता निष्ठा यांचा दुष्काळ सदैव येथे !!

तेच तेच अधिपती, लोकशाही वेठबिगार येथे 
मतदानाचा पंचनामा, गरीबीचा लिलाव येथे !!

सर्जनशील घरात गुन्हेगार जिंकतात निवडणुक  येथे 
सारेच सत्तापिपासू सर्वत्र गुन्हेगारच नेते येथे !!

आनंद कोठडीया , जेऊर ,९४०४६९२२००


 
Top