तेलंगणची राजधानी हैदराबादेत एका पशुवैद्यकीय डॉक्टर युवतीवर केलेला सामूहिक बलात्कार, त्यात तिचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर तिचा मृतदेहच जाळून नष्ट करण्याचा आरोपींनी केलेला घृणास्पद प्रकार यामुळे संपूर्ण देशभर संतापाची लाट आली आहे. या घटनेचे पडसाद संसदेच्या अधिवेशनातही उमटले आहेत. दोन्ही सभागृहा तील नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी तर 'त्या बलात्कारींना झुंडीच्या हवाली करा, त्यांचा झुंडबळी जाऊ दे 'अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि या भावना प्रत्येक सर्वसामान्यांच्या आहेत !


दोषींना फाशी देण्यासाठी कायदा आणखी कडक करायला हवा, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत व्यक्त केलं आहे. सर्व सदस्यांचे म्हणणे मांडून झाल्यावर लोकसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू म्हणाले, 'अशा प्रकारच्या अमानुष घटना कायद्याद्वारे नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीद्वारे निकाली काढल्या जाऊ शकतात. बलात्कारासारख्या पाशवी कृत्यांना आळा घालण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीद्वारेच काहीतरी ठोस उपाय केला जाऊ शकतो. आता अशा घटनांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाने निकाल लवकर लागतो, पण आरोपी अपीलांवर अपील करून स्वत:चा बचाव करतात. अशा नराधमांवर दया दाखवायची का? अशा लोकांची दया याचिका केंद्र सरकार, गृहमंत्रालय, राष्ट्रपतींकडे पाठवण्याची व्यवस्था का आहे ? '
परंतु प्रश्न हा आहे कि आपण फक्त कायद्याच्या नावाखाली या नराधमांना मोकाट सोडत आहोत का? कायद्याने सर्व बाबी सिद्ध कराव्या लागतात आणि कायद्यात एवढ्या पळवाटा आहेत कि ज्याच्यावर अत्याचार झाला तो त्रास भोगतो आणि गुन्हे करणारे मोक्काट फिरतात.एवढे दिवस या विकृत मनोवृत्ती सिनेमातून दाखविल्या जात होत्या मात्र आता पावलोपावली प्रत्यक्षात भेटत आहेत मग त्या नातेवाईक ,शिक्षक ,डॉक्टर, शेजारी ,मित्र ,प्रियकर असेल अथवा कामाच्या ठिकाणचे सहकारी या स्वरूपात दिसत आहेत. कायद्याने कितीही कडक रूप धारण केले तर तेवढ्याच पळवाटा निर्माण होत आहेत. त्यामुळे जरी राजनाथ सिंह यांनी या घटनेला मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे असं म्हटल आणि सर्व पक्ष अशा घटना रोखण्यासाठी कायदा जितका कठोर करू इच्छितात, तितका तो कठोर करण्यास सरकार तयार आहे, अशी ग्वाही दिली असली तरी आपल्याकडे एखादी घटना घडल्यानंतर थोडे दिवस त्यावर काथ्याकूट होतो पुन्हा पहिले पाढे पंचावन्न
  जया बच्चन यांनी हैदराबादमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने उद्विग्न होऊन  'आपण किती वेळ आणि घटनांत  केवळ चर्चा करत बसणार? हैदराबाद झालं, निर्भया झालं, कठुआ झालं,पुणे झालं . मला वाटतं आता सरकारला जाब विचारायला हवा. या सर्व घटनांमधील मुलींना आतापर्यंत किती न्याय मिळाला हे सरकारने सांगायला हवंय.'
काहीजणांना जया बच्चन यांचे हे शब्द कायदा तोडणारे वाटत असले तरी अत्यंत कठोर आणि सार्वजनिक शिक्षा झाल्याशिवाय अशा घटनांना आळा बसणार नाही कारण या प्रकारच्या गुन्हयामद्ये वर्षानुवर्षे चालणाऱ्या अशा केसेसमद्ये आरोपी निर्दोष सुटतो त्यामुळे तो पुन्हा दुसरा गुन्हा करायला घाबरत नाही कारण त्याला माहित असते आपण कोणत्याही प्रकरणात पैसा फेकून निर्दोष होऊ शकतो. आता आपल्याला थोडास कायद्याच्या चौकटीतून बाहेर पडत या आरोपींचा तातडीने बंदोबस्त व्ह्यायला हवा हि भावना काळाची गरज आहे नाहीतर एकवेळ अशी येईल कि लोक कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत. त्यातल्यात्यांत हि गोष्ट चांगली कि गुन्हेगारांचे घरचेही आरोपीना सवरक्षण न देता त्यांनी ज्या पद्धतीने गुन्हा केला त्याच पद्धतीने त्यांना शिक्षा द्यावी आमचे सहकार्य राहील असा पवित्र घेतला तो खरंच विचार करायला लावणारा आहे. 
महाराष्ट्रातहि झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या विरोधात विधानपरिषदेचा उपसभापती डॉ नीलमताई गोर्हे यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी मोठा आवाज उठवला आहे आता तर मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे . त्यामुळे अशा घटना विरोधात कडक कायदे करून आरोपींना जास्तीत जास्त लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. 
 
Top