शेळवे (संभाजी वाघुले) - शेळवे ता.पंढरपूर येथील खंडोबा देवाच्या याञेस सोमवार दि.२ डिसेबर पासुन सुरवात होणार आहे. शेळवे येथील खंडोबा याञा ही चार दिवसाची असते.
 यात सोमवार दि. २ डिसेबर रोजी राञी देव गावात येतो व खंडोबा देवाच्या छबिन्यासह भेटीचा नयनरम्य कार्यक्रम असतो.मंगळवार दि ३ डिसेंबर रोजी मुख्य याञा आहे.यावेळी संपुर्ण गावातून व परगावाहूनही खंडोबाचे भक्त वांग्याचे भरीत , बाजरीची भाकरी व कांद्याच्या पातीचा आगळा वेगळा नैवद्य  घेऊन येतात व खंडोबा देवाला दाखवला जातो.याच दिवसी म्हणजे मुख्य याञेदिवसी  मंदिरात नयनरम्य गझीढोलचा पारंपारिक कार्यक्रम साजरा केला जातो . हे गछीढोलच या याञेचे आकर्षण असते.गछीढोलाचे पथक अनेक ठिकाणीचे आमंञित केलेले असतात.या दिवशी भक्तांनी बोललेले नवस  फेडण्यासाठी मोठी गर्दी असते.बुधवार दि ४ रोजी भल्या पहाटे खंडोबा देवाचा लंगर तोडण्याचा कार्यक्रम असतो .हा लंगर देवाचे पुजारी तोडतात. दिवसभर मनोरंजनाचे कार्यक्रम असतात.
गुरुवार दि ५ रोजी खंडोबा देवाचा छबिना काढून देव गावात जातो व याञेची सांगता होते.
 सोमवार दि  २५ नोव्हेंबर रोजी खंडोबा देवाचे घटस्थापना झालेली आहे घटस्थापनेपासून दररोज सकाळी व सायंकाळी छबिना काढला जातो.घटस्थापनेपासुन ते मुख्य याञेचा भरीत बाजरीचा नैवद्य दाखवेपर्यंत शेळवे येथील प्रत्येक घरातील म्हैसीचे दुध विक्री व उसने देणे घेणे बंद असते. या संपुर्ण सात ते आठ दिवसाच्या दुधाचे घटस्थापनेपासून दररोज दुधाचे ताक करुनच गावात सर्वाना व गोरगरिबांना ते ताक वाटप करायचे असते. यालाच खंडोबाचे अणसुट म्हणतात. या सात आठ दिवसात शेळवे गावात चहाला किंवा एखाद्या लहान बाळालासुद्धा दुध पिण्यास मिळत नाही.
याञेसाठी सर्व ग्रामस्थ ,शेळवे ग्रामपंचायतीने संपुर्ण गावात स्वच्छता केली आहे व खंडोबा मंदिर व परिसरात शेळवे कृृषि विद्यालयाकडुन रंगरंगोटीचे काम केले आहे.विजवितरण कर्मचार्यांनी लाईटीचे सर्व कामे पुर्ण केली आहेत असे खंडोबा याञा कमेटीने व शेळवे ग्रामपंचायतीने सांगितले.
 
वाघुले दादांचे निधन झाल्यामुळे संपुर्ण गावाला व याञा कमेटीला वसंत (दादा)वाघुले यांची प्रखरतेने आठवण येत आहे.कारण यापुर्वी याञेचे संपुर्ण नियोजन वाघुले दादाच पाहत होते.
 
Top