चीनमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मनू भाकरनं महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. तिनं २४४ पूर्णांक सात दशांश गुण मिळवत अव्वल स्थान मिळवलं. सर्बियाच्या झोराना अरुनोविचनं रौप्य तर चीनच्या क्वियान वँगनं कांस्य पदक पटकावलं. मात्र, भारताच्या यशस्विनी सिंग देसवालला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
बुधवारी तिला महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल गटात फायनलसाठी पात्रता मिळवता आली नव्हती.
अवघ्या १७ वर्षीय मनू भाकर हिने ज्युनिअर विश्व विक्रमाची नोंद करीत सुवर्णपदक पटकावले आहे. यासोबतच ती आयएसएसएफ विश्व कपमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी हिना सिद्धूच्या नंतर पदक जिंकणारी दुसरी भारतीय नेमबाज बनली आहे.
 
Top