पंढरपूर प्रतिनिधी- २६ नोव्हेंबर २०१९ रोजी डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून तसेच भारतीय संविधानाला पुष्पगुच्छ वाहून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानाच्या प्रास्ताविकेची सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले.
   

या कार्यक्रमास बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा प्रतिनिधी रवी सर्वगोड, आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक गौतम सरतापे,गौतम साबळे, पंचशील तरुण मंडळाचे अध्यक्ष आर.पी.कांबळे, पंढरपूर विधानसभा अध्यक्ष अँड सी एस बनसोडे, माढा विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे,अँड महेश कसबे,मनोज वनसाळे, लक्ष्मण रणदिवे, श्रीकृष्ण प्रक्षाळे, अरुण कांबळे यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बा.ना.धांडोरे होते,     प्रमुख मार्गदर्शक बामसेफ जिल्हा संयोजक एल.एस.सोनकांबळे यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले कि आज दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी, कायद्यासमोर सर्व माणसे समान हे तत्व मान्य केले असून, २५ नोव्हेंबर १९४९ रोजी, कायद्यासमोर सर्व माणसे असमान होती. २७ नोव्हेंबर १९४९ पासून आपण एक माणूस, एक मत,एक मत एकच किंमत हे तत्व तत्वत: मान्य केले आहे. वर्तमान भाजपा सरकार महाराष्ट्राच्या राजकारणाची क्रूरपणे नासधूस करीत आहे. हे कृत्य भारतीय संविधानाच्या मूळ तत्वाविरोधी आहे.अशा परिस्थितीला रोखण्यासाठी बहुजन समाज पार्टी च्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती शिवाय देशाला पर्याय उरलेला नाही म्हणून बहनजीचे नेतृत्व मान्य करुन देशवासियांनी बहनजींचे हात बळकट करावेत .
  या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बहुजन चळवळीचे जेष्ठ मार्गदर्शक शैलेश साळुंखे यांनी केले.
 
Top