शेळवे ,(संभाजी वाघुले) - महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा विधी मंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात मंजूर व्हावा म्हणून "पुर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्ण हक्क परिषद आंदोलन करत आहे." 

रुग्ण हक्क परिषद ही संघटना रुग्णांसाठी काम करत असते.रुग्णासाठी "रुग्ण हक्क संरक्षण कायदा" होणे हे शास्वत व मोफत औषधोपचारा साठी महत्वाचे आहे . जनतेला आरोग्य व आरोग्याची सेवा मिळणे हा सुद्धा नागरिकांचा हक्क आहे.पैसा नसल्याने अनेक रुग्णांना आपला मौल्यवान जीव गमवावा लागत आहे .यामुळे आपण आपल्या आरोग्याचा हक्क मागत असताना या हक्काला कुठेतरी संरक्षण मिळावे. यासाठी हे घंटानाद आंदोलन होणार आहे.

आज डिपाॅझिट न भरल्यामुळे किंवा पैसे संपल्याच्या कारणाने अनेक गोरगरिब रुग्णांवर पुढील उपचार थांबवले जातात व रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.याचसाठी रुग्ण हक्क संघटना जीवाचे रान करेल व सर्व रुग्णांना त्यांचा हक्क मिळवुन देईलच.

आपली मागणी ठामपणे सरकारपुढे मांंडण्यासाठी महाराष्टाच्या मुख्यमंञी शपथविधी दिनी सर्व जिल्हाकार्यालयासमोर सकाळी १०:३०वाजता मोठ्या संख्येने रग्ण हक्क परिषदेचे सर्व पदाधिकारी व नागरिकांनी सुद्धा सहभागी व्हावे , असे आवाहन रुग्ण हक्क परिषदेच्या अध्यक्षा अँड.वैशाली चांदणे व प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले आहे .
 
Top