रायगडचा युवक दिवाळी अंक प्रकाशन

    अलिबाग,(प्रतिनिधी)- समाजातील नागरीक आपल्या हक्कासाठी आडून बसतात त्याचप्रमाणे कर्तव्य म्हणून देशसेवेचे व्रत घेवून आपण व आपल्या कुटुंबियांच्या रक्षणाचा प्रथम विचार केला पाहिजे. फक्त पायदल, हवाई दल, आणि नेव्ही आहेत आपल्याला काय करायचे त्याचे असा विचार न करता देशाला सर्वात मोठा धोका समुद्र मार्गाचा असतो आणि आहे यासाठी किनाऱ्यावरील प्रत्येकाने सतर्क राहून नजिकच्या पोलिस दलाला काही संशयास्पद घटना घडताच कळविले पाहिजे, असे मार्गदर्शन सागरी सुरक्षा तज्ञ तथा ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांनी केले. 

रायगडचा युवक प्रकाशन प्रसंगी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडीअर हेमंत महाजन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद दुसाणे-जिल्हा माहिती अधिकारी अकोला, संपादक जयपाल पाटील, रायगड जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमदास वळवी, प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या भारती दीदी उपस्थित होत्या. यांच्या हस्ते रायगडचा युवक दिवाळी अंक २०१९ आपत्ती व सुरक्षा विशेषांकाचे प्रकाशन झाले. 

  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद दुसाणे म्हणाले की, प्रत्येक नागरीकाने आपल्या सुरक्षेचा पदोपदी विचार केला पाहिजे. ज्यामुळे आपणाला कधीही अपंगत्व येणार नाही किंवा कुटुंबाला सोडून जाता येणार नाही. यासाठी पावलोपावली सुरक्षेचा विचार सध्याच्या काळात प्रत्येकाने केलाच पाहिजे. अंकाचे संपादक रायगड भूषण जयपाल पाटील यांनी संपूर्ण भारत देशात जनतेला आपत्ती व सुरक्षेचे ते ज्ञान देत आहेत, हे एका ज्येष्ठ पत्रकाराने घेतलेले वेगळे व्रत असून त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. 

  ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांच्या हस्ते राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी महाराष्ट्र टिम मध्ये निवड झालेला श्लोक पाटील याचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांना श्लोक पाटील याने मल्लखांबवरील कसरती दाखविल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयपाल पाटील यांनी केले. ते म्हणाले, १३ वर्षात विविध पुरस्कार प्राप्त दिवाळी अंकाचा यंदाचा आपत्ती व सुरक्षा या विषयामध्ये तज्ञ असलेल्या लोकांकडून लेख मागवून हा अंक काढला आहे . 
 कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मिलिंद पाटील यांनी केले. आभार पत्रकार जयप्रकाश पवार यांनी मानले. 

कार्यक्रमास रायगड पेालिस दलातील उजळणी वर्गाचे महिला व पुरुष सदस्य, डॉ. मुनीरभाई तांबोळी, श्रेयस रमण ठाकूर, सौ. भारती शहा, प्रदीप पाटील, अब्दुल मुल्ला,संकेत टाकले रायगड जिल्हा महाजन फॅन्स क्लबचे दर्शन प्रभू, धावपटू सुधाकर राणे, वर्तक ग्रंथपाल, इतर आर.सी.एफ. स्कुलचे विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.
 
Top