*मंगळवेढा शहरातील डास,मलेरिया डेंग्यु अशा अनेक रोगावर आरोग्य विभागाने शहरात फवारणी करावी - शिवबुध्दच्या महिला अध्यक्ष विजयालक्ष्मी मुढे
मंगळवेढा (प्रतिनिधी) - मंगळवेढा नगरपरिषद मुख्याधिकारी सौ.पल्लवी पाटील यांना निवेदन देवून मंगळवेढा शहरात सद्या डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झालेला असून त्यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण आहे मंगळवेढा नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून शहरात तातडीने डास निर्मुलनासाठी फरवारणी व उपापययोजना करण्यात यावी अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महिला आघाडीच्याकडून  करण्यात आली. मंगळवेढा शहरात काही दिवसात तापाच्या आजाराच्या रूग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. नागरिकांच्या जिवतास धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेवून नगर पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महिला आघाडी वतीने मंगळवेढा नगरपरिषद समोर उग्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन शिवबुध्दच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा विजयालक्ष्मी मुढे,मंगळवेढा शहराध्यक्षा रेखाताई भंडारे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत देण्यात आले .
 
Top