पंढरपूर- आज पहाटे राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सपत्निक श्री विठ्ठल रुक्मिणीची कार्तिक शुद्ध एकादशी निमित्त शासकीय महापुजा केली.                   त्यानंतर मंदिर समितीच्यावतीने तुकाराम भवन मध्ये  आयोजित  कार्यक्रमात  पंढरपूर शहर भाजपाच्यावतीने पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांच्या तळ पायाला खडे टोचू नयेत,यासाठी दर्शन रांगेत मॅट (रेड कारपेट) अंथरणे करिता  ५ लाख रुपयांच्या निधीचा धनादेश ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते भाजपा शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी मंदिर समितीचे अध्यक्ष डाॅ अतुल भोसले यांचेकडे सुपूर्द केला.                 
  यावेळी भाजपाध्यक्ष संजय वाईकर यांचे सोबत एव्हरेस्ट इन्फ्रास्टक्चर अँन्ड डेव्हलपर्सचे संचालक अशोक भोसले,भाजपा कार्यालय प्रमुख आनंद नगरकर उपस्थित होते.          
 यावेळी व्यासपीठावर मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर,सोलापूरचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले,पंढरपूरचे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले,मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच मंदिर समितीचे विश्र्वस्त उपस्थित होते.              
यापूर्वीही आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर शहर भाजपा व न्यू सातारा समूहाच्या वतीने पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांच्या तळ पायाला खडे टोचू नयेत , यासाठी दर्शन रांगेत मॅट अंथरणे करिता  ५ लाख रूपये निधीचा धनादेश देण्यात आला आहे .
 
Top