सांगली - सांगली, कोल्हापूर, बेळगाव भागामध्ये येवून गेलेल्या पुरामुळे खूप मोठी आर्थिक हानी झालेली आहे.या भागातील पूरग्रस्त बांधवांना दक्षिण भारत जैन सभेमार्फत आर्थिक मदत देण्यात येत आहे. दि.१ नोव्हेबर २०१९ रोजी या मदतीच्या चेक्सचे वितरण करण्यात आले यावेळी सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, केंद्रिय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्य महामंत्री डॉ.अजित ज.पाटील, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार पा.पा.पाटील आदी उपस्थित होते

         सुमारे साडेचारशे पूरग्रस्त कुटुंबांसाठी सभेमार्फत सुमारे पाच लाख रुपयांच्या मदतीचे वितरण सभेच्या बोर्डिंग्ज आणि श्राविकाश्रमांच्या माध्यमातून करण्यात येत आहे तसेच सभेमार्फत प्रतिवर्षी सुमारे तीनशे विद्यार्थ्यांना साधारण सोळा लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०१९ -२० या शैक्षणिक वर्षात वितरीत करण्यात येणा-या या शिष्यवृत्तीसाठी पूरग्रस्त भागातील विद्यार्थी - विद्यार्थीनींची प्राधान्याने निवड करुन काही प्रमाणात त्यांना दिलासा देण्याचे काम सध्या सभेमार्फत सुरु आहे.
 
Top