वाट पाहुनी दमले ,घोड कुठे अडले समजेना 
संशयाच काहूर माजंल ,कोड कांहीं सुटेना
युतीचं नातं कसं सांभाळावे 
अनुभवी असूनही समजना 
लगीन होण्यापूर्वीच वऱ्हाडी रुसलं 
समजूत कशी काढावी समजेना 
नवरदेव कोण हे कळेना 
मुरळी सुटली बडबडत, मनांत काय ते उमजेना दिल्लीच्या मनांत तेच कमळाच्या मुखात 
बाणावर बाण हल्ले कांही थांबेना 
कोण कोणाच ऐकेना, वरून युती आतून भीती 
बारामतीच्या जे मनात 
ते दिल्लीच्या येईना ध्यानात 
बाणाची अन बारामतीकराची भेट 
माजलं तर्क वितर्काच काहूर
संशयाने टकुर कांही चालेना 
वऱ्हाडी कुंकू चालना मुंबईचा हलवा मनांत बसेना
सूर्य उगवला तरी अंधार कांही हटेना !!

आनंद कोठडीया,जेऊर ,९४०४६९२२००


 
Top