अहमदनगर - राज्यस्तरीय विविध पुरस्कार प्राप्त निशांत दिवाळी अंकाची १९ वी आवृत्ती वाचकांच्या हाती  देतांना आनंद होत असल्याची भावना संपादक निशांत दातीर यांनी व्यक्त केली.

     यावर्षीच्या अंकात आंतरराष्ट्रीय व्यापार युद्ध आणिमंदिची पडछाया या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजयकुमार पोटेभागा वरखडेकैलास ढोकेअशोक ढगे यांचे परखड विचार प्रसिद्ध केले आहेत पाणी आणायचं कुठून आणि वाचवायचं कसं या परिसंवादात नद्या प्रदुषण मुक्तीचे अभ्यासक अनिल पाटीलपर्यावरण तज्ञ विनोद बोधणकरमुकुंद गायकवाडउदय गायकवाड तसेच काय घडतयं शिक्षण विश्वात  या  परिसंवादात पंडित विद्यासागरविवेक वेदनकरप्रादेवांग शिंदे,भाऊ चासकर,रमेश पानसे,कृतीका बुरघाटेआणि भगव्याने मारली बाजी  या  परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार विश्वास महेंदळे,सचिन सावंत,राजु वाघमारेडॉ.कांता नलवडेसुहास वारे आदि मान्यवरांचे विचारनिशांत दिवाळी अंकात प्रसिद्ध केलेले आहेत.

  राजकीय  बौद्धीक परिसंवादाबरोबरच चित्रपटसृष्टीतील तारे तारकांचे अनुभवही अंकात प्रसिद्ध करण्यातआले आहेत यामध्ये सिने अभिनेत्री मानसी नाईक ,मृण्मय देशपांडेजितेंद्र जोशीभारत गणेशपुरेअक्षयटंकसाळे,अभिज्ञा भावे यांचे विविधअनुभवास प्रसिद्धीदेण्यात आली आहेपु .लं देशपांडे यांच्या विनोदाचे स्वरुप हा डॉ.श्रीकांत नरवडे यांचा ,बोल बसमती बोलहा डॉ.अंजली श्रीवास्तवयांचा,येथील सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ.रत्ना नजन नागेश शेवाळकर काशिनाथ बारंबेनिर्मला भयावळ यांच्या लेखांना प्रसिद्धी दिली आहेसुप्रसिद्ध व्यंगचित्रकार महादेव साने यांचे सद्याच्या परिस्थितीवरील व्यंगचित्रे आहेत.

 
Top