पालघर,(प्रतिनिधी) - पालघर जिल्हा विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिप मान पालघर पोलीस मुख्यालयास मिळाला. २ नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीमध्ये पाचवी विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०१९ पालघर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा कोळगाव पोलीस परेड मैदान येथे आयोजित करण्यात आलेली होती.


या स्पर्धेमध्ये एकूण १२६ खेळाडूंनी भाग घेतला होता. यामध्ये वसई , पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार आणि पालघर मुख्यालय अशा सहा विभागांनी आपला सहभाग नोंदवला. जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये १०० मीटर,२०० मीटर, ४०० मीटर ,८०० मीटर, थाळीफेक ,गोळाफेक, लॉंग जंप, हाय जंप मध्ये चांगल्याप्रकारे कामगिरी केलेली आहे तसेच सांघिक- व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅण्डबॉल , कबड्डी ,खो-खो मध्ये ही चांगली कामगिरी केलेली आहे. सांघिक प्रकारात पुरुष संघ पालघर पोलीस मुख्यालय, फुटबॉल- बोईसर विभाग, हॉलीबॉल -जव्हार विभाग, बास्केटबॉल- डहाणू विभाग, हँडबाँल -वसई विभाग, कबड्डी- पालघर पोलीस मुख्यालय, खो-खो -पालघर विभाग तसेच महिला क्रीडा स्पर्धांमध्ये हॉलीबॉल -पालघर मुख्यालय, बास्केटबॉल- बोईसर विभाग, कबड्डी- वसई विभाग ,खो-खो - वसई विभाग या विजयी संघांना प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पालघर जिल्हा विभागीय पाचवी पोलीस क्रीडा स्पर्धा २०१९ चा जनरल चँपियन्स संघ म्हणून पोलीस मुख्यालय या संघाची तसेच बेस्ट अँथलिस्ट पुरुष म्हणून पोलीस शिपाई दीपक सुमडा ,बेस्टअँथलिस्ट म्हणून महिला पोलीस शिपाई संगीता गडग यांची निवड करण्यात आली आहे


पालघरचे पोलीस अधीक्षक श्री गौरव सिंग यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या क्रीडा स्पर्धेचा सांगता सोहळा पाच नोव्हेंबर २०१९ रोजी दांडेकर कॉलेज पालघर येथे पार पडला. 
  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक पालघर श्री गौरव सिंग तसेच अध्यक्ष म्हणून सेनापति दांडेकर शिक्षण संस्थेचे चंद्रकांत दांडेकर हे होते .पालघर जिल्हा पोलीस दलातील विजयकांत सागर - अप्पर पोलीस अधीक्षक वसई, योगेश चव्हाण - अप्पर पोलीस अधीक्षक,पालघर , विश्वास वळवी - गृह उपअधीक्षक,पालघर ,श्रीमती अश्विनी पाटील- उपविभागीय पोलिस अधिकारी वसई, श्रीमती रेणुका बगाडे - उपविभागीय पोलिस अधिकारी,विरार , सुहास शिंदे - राखीव पोलीस निरीक्षक पालघर तसेच सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पालघर जिल्ह्यातील इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
Top