नाशिक,(प्रतिनिधी) - आजच्या युगामध्ये रस्ता व त्यावरील वाहने यांना प्रगतीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्त्व आहे. परंतु वाहनाच्या अतिरेकी वेगामुळे दररोज अनेक अपघात घडतात. यावर उपाय म्हणून कायद्यांमध्ये वेळोवेळी बदल करणे तसेच विविध जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये वाहन व वाहन कायद्याबाबत जनजागृती केली जात आहे .समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कायदेविषयक सकारात्मक बदल होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून व पोलीस खाते अत्याधुनिक करण्याकरिता एक प्रगती पाऊल म्हणून पोलिसांच्या वाहन ताफ्यामध्ये अत्याधुनिक साधनांनी युक्त अशी वाहने वाहतूक नियमन करण्याकरता आणण्यात आली आहेत . 


वाहनांवरील अत्याधुनिक साधने व्हिडिओ लेझर स्पीड मॉनिटरिंग सिस्टिम( लेझर स्पीडगन) ,लेझर स्पीड डिवाइस व हार्ड फुल एचडी कॅमेरा- वाहनांचा वेग व अंतर मोजले जाते ,व्हिडिओ क्लिप रेकॉर्डवर साठवला जातो . 
   ब्रेथ अँनालायझर- यात मद्याच्या सेवनाखाली असताना वाहन चालवल्यामुळे अपघात होतात त्यावर प्रतिबंधक करण्याकरता सदर वाहनांमध्ये येताना ब्रेथ अँनालायझर उपलब्ध करून दिले आहे . 
टिंट मीटर इंस्पेक्टर- वाहनांच्या काचा काही मर्यादेपर्यंत आपण डार्क करू शकतो टिंट मीटर इंस्पेक्टरच्या माध्यमातून गाड्यांच्या काचांची ह्विएलटी विजीबल लाईट ट्रान्समिटन्स तपासले जाते .वाहनांमध्ये दोन स्वतंत्र बॉक्स उपलब्ध करून दिले आहेत त्यापैकी एकामध्ये लाईट स्क्रीन व दुसरे मध्ये सेन्सर आहे .काचेच्या दोन्ही बाजूस हा बॉक्स जोडल्यानंतर त्याचे स्किन वर गाडीच्या काचेची दृश्यमानता दिसून येते. अशाप्रकारे नाशिक पोलीस दलामध्ये वरील तीन अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज अशा दोन नवीन एर्टिगा वाहनांचे आगमन झाले आहे. वाहतूक नियमना करीता या अत्याधुनिक वाहनांमुळे अत्यंत मोलाची मदत होऊन भविष्यात वाहतूक नियमन करणे सुलभ होणार आहे.
  या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडत असताना नाशिक जिल्ह्यातील पोलिस देशाच्या सर्वोच्च सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलत आहेत.  
 
Top