पंढरपूर (प्रतिनिधी) -पंढरपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण भागातील एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून, गुप्तांगावर वार करून खून करण्यात आला होता.या प्रकरणी दोन तृतीय पंथीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. पंढरपूर येथील स्टेशनरोडवर खादी ग्रामोद्योग ठिकाणी काही दिवसांपूर्वी मध्यरात्री ब्रम्हदेव महादेव गुटाळ (वय-५९)यांचा काचेच्या फुटलेल्या बाटलीतून पोटावर वार करून तसेच डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.या खून प्रकरणात तृतीयपंथीयसह तिघांना अटक करण्यात आली असून अक्षय उर्फ आकाश उर्फ डर्जा रमेश जाधव,वय वर्ष २३ रा. बेलीचा महादेव मंदिर जवळ, संभाजी चौक पंढरपूर, दिंगबर उर्फ डिग्या काशिनाथ महानवर ,वय वर्ष २१,या सेंट्रल नाका पंढरपुर ,नागेश उर्फ मोनिका विठ्ठल शिंदे,वय वर्ष २३ रा कुंभार घाट, सहकार चौक,पंढरपूर, विधि संघर्ष बालक माऊली श्रीकांत सगरे ,वय १७ वर्षे ,राहणार नामानंद महाराज मठा समोर पंढरपूर अशी नावे असून तीन संशयीत आरोपींना अटक केलेली आहे.

वरील घडलेल्या खुन प्रकरणी तपास करताना सदर मयताचे गुप्तांगास जखम असल्याने व सदर घटनेच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी तृतीयपंतीचा वावर असल्याने हा गुन्हा त्यांच्याकडून घडला असल्याचा संशयावरून तपास केल्यावर मयताची तृतीयपंती सोबत सलगी होती व रात्रीच्या वेळी दारुचे व्यसन त्यांच्याबरोबर करत असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हि कारवाई करण्यात आली. 
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे , उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे पंढरपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड,पोकाँ बिपिनचंद्र ढेरे,पोना गणेश पवार, पोना किशोर गायकवाड,पोना सतीश चंदनशिवे,  पोना मच्छिंद्र राजगे,पोना इरफान शेख, पोना अभिजित कांबळे, पोना शोएब पठाण, पोना प्रसाद औटी, पोकाँ प्रवीण पाटील, पोकाँ गणेश इंगोले ,पोकाँ संजय गुटाळ यांनी केली असून 
सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद गावडे हे करत आहेत .
 
Top