पणजी, गोवा - iffigoa.org इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा महोत्सवाच्या ५० व्या अंकाला काल गोव्यात पणजी इथं प्रारंभ झाला. 



या सुवर्ण महोत्सवी इफ्फीसाठी भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील अनेक तारे उपस्थित होते . 


माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, भारतीय संस्कृतीची ताकद भारतीय चित्रपटांनी जगभरात पोहोचवली आहे. चित्रपट उद्योगाच्या विविध गरजांसाठी सरकारनं एक खिडकी पद्धत सुरु केली आहे. दृष्टी दोष बाधितांसाठी अधिक चित्रपट काढावे असं आवाहन त्यांनी निर्मात्यांना केलं. 
या झगमगत्या सोहळ्यात सुपरस्टार रजनीकांत यांना ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत सुवर्ण महोत्सव विशेष गौरव पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रदान केेले.  केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांच्यासह अनेक मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. 
 
Top