पंढरपूर दि.२० :-पंढरपूर विभागात ग्रामीण भाग सेवकाच्या विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन डाकघर विभागाचे अधीक्षक एन रमेश यांनी केले आहे.

    चीफ पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्या सुचनेनुसार पंढरपूर विभागात ग्रामीण डाक सेवकाच्या  विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://indiapost.gov.in व  https://appost..in/gdsonline  या संकेत स्थळावर दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत सादर करावेत.

    अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक १ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वसाधारण प्रवर्गासाठी (OC) वय १८ ते ४०, इतर मागासवर्गीयांसाठी (OBC)  वय  १८ ते ४३,  तसेच अनुसूचित जाती व  जमातीसाठी (SC/ST) वय १८ ते ४५ वर्षा पर्यंत असावे. या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी पास असून, उमेदवारास संगणकाची माहिती असावी तसेच उमेदवाराने कमीत कमी ६० दिवसाचे प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी https://indiapost.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी असे आवाहनही पंढरपूर डाक घर विभागाचे अधीक्षक एन रमेश यांनी केले आहे
 
Top