पंढरपूर - पंढरपूर येथे डेंग्यूची साथ यामुळे एक जण मृत्युमुखी पडला असून अनेक रुग्ण दवाखान्या मध्ये उपचार घेत आहेत पंढरपूर शहरात डेंग्यूचा प्रादुर्भावमुळे त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी अपयशी ठरल्याचे सांगत जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने पंढरपूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना पत्र दिले असून आरोग्य विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा गुरुवारी दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शासकीय वेळेस एक दिवसाचे बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिलेला आहे याबाबत पंढरपूर नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी डेंग्यूचा प्रादुर्भाववर नियंत्रण आणण्या साठी म्हणावे असे कार्य करताना दिसून येत नसून याबाबत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोनवरून विचारणा केली असता आमच्याकडे औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे यावरून त्यांचा हलगर्जीपणा दिसून येतो.शहरात प्रत्येक वॉर्डांमध्ये साथीचे रोग नियंत्रणात येण्यासाठी आवश्यक असणारी फवारणी करण्यात येत नसल्यामुळे डेंग्यूच्या आजाराने अनेक नागरिक त्रस्त झालेले आहे तरी संबंधितांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत असे पत्र जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना देण्यात आले आहे. 
या पत्रावर जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख , जिल्हा संघटक सुरेश नवले, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हाबळे, जिल्हा संपर्क प्रमुख माऊली भोसले, तालुकाध्यक्ष संतोष पोकळे ,तालुका उपाध्यक्ष रमेश लंगोटे, तालुका युवक अध्यक्ष सचिन आटकळे यांच्या सह्या आहेत.
 याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर नगरपालिकेच्यावतीने याबाबत आमदार प्रशांत परिचारक आमदार भारत भालके, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.
यात स्वेरी, कर्मयोगी, सिंहगड, उमा, कर्मवीर व विवेक वर्धिनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आरोग्य मित्र म्हणून बरोबर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता .
शहरात डेंग्यू सदृश्य आजारावर नियंत्रणासाठी औषधाची धुराळणी, फवारणी केली जात असून . दुषित पाणीसाठेही नष्ट केले जात आहेत. , यासाठी नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी संग्राम गायकवाड, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे , नागनाथ तोडकर ,मलेरिया पर्यवेक्षक धर्मांण्णा गजाकोश प्रयत्न करत आहेत.तरी सर्व नागरिकांनी घरी आलेल्या स्वच्छता मित्रांकडून आपले सर्व पाणीसाठे तपासून घ्यावेत व नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेमार्फत केले आहे.
 
Top