पंढरपूर, दि.०६ - कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविक येतात पंढरपूर शहरातील सर्व  मांस, मटण, मासे, प्राणी कत्तल व मद्यविक्रीची दुकाने गुरुवार दि.७ ते  शनिवार दि.९ नोव्हेंबर २०१९ रोजीपर्यंत बंद राहणार असल्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी अजित देशमुख यांनी आदेश पारीत केले आहेत.

     कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात लाखो वारकरी येतात. वारीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ अन्वये पंढरपूर शहरात हे  आदेश जारी केले आहेत.  हे आदेश दिनांक ०७ ते ०९ नोव्हेंबर २०१९ पर्यंत जारी राहतील असेही आदेशात अप्पर जिल्हा दंडाधिकारी अजित देशमुख  यांनी नमूद केले आहे.
 
Top