पंढरपूर,(प्रतिनिधी )-कोर्टी ता.पंढरपूर येथील  प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी ज्ञानमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, टाकळी, पंढरपूर येथे दिनांक १९ नोव्हेंबर २०१९ ज्ञानप्रबोधिनी ग्रुप  यांच्यामार्फत पाचवीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 


यामध्ये प्रामुख्याने *मनशक्ती कशाप्रकारे वाढवावी ,* मेंदूची क्षमता वाढवणे,*ऊर्जा, ताकद, उत्साह, कशाप्रकारे वाढवावी , *प्रयत्नरसे अभ्यास पद्धती या पुस्तकांमधून अभ्यासाचे पद्धती, बुद्धीवर्धन पद्धती त्याचबरोबर दहावी ते बारावी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा मार्गदर्शन तसेच मेंदूचे व्यायाम या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. 
  या कार्यक्रमासाठी अकलूज येथील ॲडव्होकेट प्रवीण कारंडे आणि ज्ञानप्रबोधनी ग्रुप, पालवीच्या डिंपल घाडगे, मंगलताई शहा यांच्यासह पालवी परिवार उपस्थित होते. हा कार्यक्रम पालवीमधील मातृवनमध्ये पार पडला.
        
 
Top