नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या पाठपुराव्याला यश!

पंढरपूर (प्रतिनिधी):- नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग प्रभाग क्रमांक ४, जुना सोलापूर नाका परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला असून नवीन पाईपलाईन टाकण्याचे कामकाजास सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासुन या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. नगरसेवक विक्रम शिरसट यांनी या भागातील पिण्याच्या पाण्याचे गांभीर्य लक्षात घेवून नगरपरिषदेमार्फत येथील नवीन पाईपलाईनसाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता.अखेर येथील नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ प्रभागाचे नगरसेवक विक्रम  शिरसट यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग सावंतराव, सोमनाथ कोरे, रमेश नेहतराव, दत्ता सावंतराव, सोमनाथ नेहतराव, किशोर दंदाडे, मुकेश कोळी,धनंजय कोळी,अर्जुन राहुल कदम, किरण माने, रमेश तारापूरकर यांच्यासह प्रभाग क्रमांक चार मधील बांधव व महिला उपस्थित होत्या.या कामासाठी नागरिकांच्या सोबतीने नगरसेवक विक्रम शिरसट यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या या कामाचे कौतुक होत असून नागरिकां मधून आनंद व्यक्त होत आहे.
 
Top