माय नेम इस टुडे 
राजकारण..........
"जे शाश्वत नसतं स्थिर नसतं ते अस्थिर असतं 
कधी शाप तर कधी वरदान ठरतं
कधी अनमोल तर कधी कवडीमोल ठरवतं
कधी राजवाड्यात खुर्चीवर तर 
कधी उकिरड्यावर फेकतं
कधी तुपात कधी साखरेत
तर कधी मातीत खेळवत 
कधी पैशात तर कधी तमाशात नाचवत 


कधी माणसांत बसवत तर 
कधी माणसातून उठवत
कधी खोटं ते खरं तर
कधी खऱ्याच खोटं रेटून चालवंत,
कधी घुमवत कधी फिरवत
कधी पळवत कधी कुजावत 
कधी माजवत कधी सजवत


कधी मान सन्मान तर कधी अपमानीत करत
कधी देव कधी दानव बनवतं
कधी राव ,कधी बाजीराव तर कधी गुलाम बनवतं
हेच तर राजकारण असतं"!!

आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२०० 


 
Top