सत्तेच्या हव्यासापायी सत्विक्तेची माती तेच करू लागले 
जिंकण्यासाठी निवडणुका  अनैतिकतेच्या कळपात तेच रमु लागले !!१!!

चारित्र्य शुद्धतेचा डंका पेटवणारे तेच अंधारात खेळू लागले 
लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी चारित्र्याचा सौदा तेच करू लागले !!२!!

बोल त्यांचे नैतिकतेचे ,न्यायाचे अन पारदर्शकतेचे 
खेळ खेळतात ते सारे अनैतिकतेचे अन स्वार्थाचे !!३!!

आम्हीच ठेकेदार सामान्य माणसांचे दावे त्यांच्या कल्याणाचे 
  प्रत्यक्ष तेच ठेकेदार भ्रष्टाचार अन दांभिकतेचे  !!४!!

प्रसार माध्यमात ते जणू अवतार ईश्वराचे 
व्यवहार त्यांचे जीवघेणे  सारे विश्वासघाताचे !!५!! 

समजली त्यांची राक्षसी महत्वकांक्षा गळा तेच कापणारे 
तेच शिल्पकार खरे सामन्यांच्या राख्ररांगोळीचे !!६!!

आनंद कोठडिया .जेऊर ०९४०४६९२२००


 
Top