पुणे,( प्रतिनिधी) - स्वातंत्र्य समता बंधुता व सामाजिक न्यायाचा मूलभूत तत्वांवर भारताचे संविधान आधारलेले आहे त्यातील केवळ स्वातंत्र्य व समता या दोन गोष्टींवर अधिक भर दिला गेल्याने बंधूतेला दुय्यम स्थान मिळाले आहे परिणामी आज जाती-धर्म, गरीब श्रीमंत अशा वर्गीय संघर्षात आपण अडकलो आहोत. बंधूतेशिवाय स्वातंत्र्य, समतेला अर्थ नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी हडपसर येथील ज्ञानविज्ञान प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या स्नेहजागर मेळावा व जागर पुरस्कार कार्यक्रम प्रदान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.


 या ज्ञान विज्ञान प्रतिष्ठानच्यावतीने आनंद कोठाडिया यांना समाज जागर पुरस्कार ,पर्यावरण जागर पुरस्कार डॉ हेमाताई साने यांना तर अध्यात्म जागर पुरस्कार भानुदास महाराज तुपे यांना प्रदान करण्यात आला.
 

यावेळी प्राध्यापक विनय,महाराष्ट्र राज्य नरेंद्र मोदी विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव शर्मा ,राज योगिनी सीमा दीदी,आयर्न मॅन दशरथ जाधव, श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अँड विकास रासकर ,ज्ञान-विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष भालचंद्र देशपांडे, उपाध्यक्ष अनिल दाते, कार्याध्यक्ष जयवंत हापण, सचिव शोभा पाटील, डॉ.ऐश्वर्य गणदास, परिस टेमगिरे, विद्या होडे,फैयाज इनामदार, अँडवोकेट प्रफुल पोद्दार, बाळकृष्ण इनामदार, प्रवीण रणदिवे, प्राध्यापक जे.पी.देसाई उपस्थित होते.
 
Top