६५ एकरमध्ये भव्य शामीयाना; यज्ञ कुंडासह सर्व तयारी अंतीम टप्प्यात
 


 पंढरपूर (प्रतिनिधी )-पंढरपूर येथील चंद्रभागेच्या पैलतीरावर असलेल्या ६५ एकर परिसरात भव्य अशा भागवत कथा व अष्टोत्तर १०८ कुंडात्मक श्री लक्ष्मीनारायण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राजेंद्रप्रसाद बोहरा (इचलकरंजी) यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

     

दि. ६ डिसेंबर रोजी यज्ञ प्रारंभ होऊन १४ डिसेंबर रोजी यज्ञाची पुर्णाहुती होणार आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात व परिवारामध्ये सुख-शांती-उत्तम आरोग्य नांदण्यासाठी व सर्वांवर लक्ष्मीनारायणाची कृपा निरंतर राहण्यासाठी या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञाचा शुभारंभ महायज्ञ आयोजक श्री श्री १०८ श्री सीताराम दासजी महाराज (बल्डाधाम, लिचाना, जि. नागौर, राजस्थान) व यज्ञाचार्य वैदिक गणपतीविश्‍वनाथ शास्त्री (जयपूर) यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कालावधीत गौ सेवी संत संवित कैलाशचंद्रजी जोशी महाराज यांच्या सुमधुर वाणीतुन श्रीमद् भागवत कथेचे श्रवण ऐकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. यावेळी हेमाद्री संकल्प, दशविधी स्नान, विष्णु श्राध्द, प्रायश्‍चित हवन, जल कलश यात्रा, प्रयोग, पंचांग पूजन, मंडप प्रवेश, वास्तुपुजन, आचार्यदिवरण आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

शनिवार दि. ७ डिसेंबर रोजी अरणिमंथन (अग्निस्थापन), योगिनि क्षेत्रपाल, नवग्रह प्रारंभ पुजन व हवन आरंभ आदी करण्यात येणार आहे. रविवार ८ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत नित्यार्चन हवन, पुर्णाहुती, महाप्रसाद सुरु रहाणार आहे.  यासाठी महायज्ञ समिती गठीत केली असुन त्यामध्ये राजस्थान येथील भगिरथ सिंग, दिनेश पोषक, इचलकरंजी येथील गोविंद बजाज, राजेंद्रप्रसाद बोहरा, शामसुंदर काबरा, पंढरपूर येथील नंदकिशोर मर्दा, किसनगोपाल भट्टड, सोलापूर येथील ब्रीजमोहन फोफलिया, प्रकाशजी मर्दा आदींचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यात प्रथमच पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये अशा प्रकारचे भव्य असे १०८ कुंडात्मक श्री लक्ष्मीनारायण महायज्ञ व श्रीमद्भागवत कथा पारायण होत असुन याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री लक्ष्मीनारायण महायज्ञ समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top